30 May, 2016

विचारांची मर्यादा


निसर्गाच्या मर्यादेपेक्षा विचारांच्याच मर्यादेमुळे बहुधा मनुष्याच्या पुष्कळश्या गोष्टी करायच्या राहून जातात. म्हणजे बघा ना, निसर्गाने दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान ई. सर्व अवयव व्यवस्थित देऊनही आणी स्वतःच्या मेहनतीने पुष्कळश्या गोष्टी मिळविता येऊनही आपण पैसा नाही, संधी नाही, वडिलांचा व्यवसाय नाही, मला हे जमत नाही, ते जमत नाही असल्या अमुक- अमुक गोष्टी नाही म्हणुन कित्येक गोष्टी करीत नाही. आणी मग माझ्याजवळ हे असत तर किंवा मला संधी मिळाली असती तर मी असं केलं असत किंवा अमुक- अमुक ठिकाणी पोहोचलो असतो असं म्हणून स्वतःबद्दलच वाईट वाटुन घेत बसतो.

खरंतर संधी प्रत्येकालाच मिळत असते आणी त्याचं सोन करण्याची क्षमताही बहुतेकांकडे असते पण पुष्कळदा आपण मानसिकरीत्या कमी पडतो. कधी ताणामुळे, कधी कुटुंबामुळे तर कधी मानसिक- आर्थिक परिस्थितीमुळे. 'मी हे करू शकत नाही किवा हे मला जमणार नाही' असा विचार करून आपणच आपल्याला मर्यादा घालुन देत असतो. जस ह्या जगात नियम हे मनुष्यानेच बनविले असतात, निसर्गाचा कुठला नियम नसतो आणी जो असतो तो जगातील प्रत्येकालाच लागू होतो अगदी त्याच प्रमाणे निसर्गाच्या कुठल्या मर्यादा नसतात आणी ज्या असतात त्या सर्वांनाच लागू होत असतात.

शमता असने आणी ती सिद्ध करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. शमता पुष्कळजनात असते पण त्यातीच थोड्याच जणांनी ती सिद्ध केलेली असते म्हणून त्यांनी इतरांपेक्षा काहीतरी मोठ केलेलं असतं. मनुष्य स्वतःला जिथे पाहतो तेच तो बनत असतो असं लॉ ऑफ आकर्षणाचा सिद्धांत सांगतो. म्हणजेच तो स्वतःबद्दल जे विचार करतो किवा जिथे स्वतःला इमेजीन करतो तिथेच तो पोहोचता फक्त त्यासाठी तेवढ्या मेहनतीची गरज असते.

रिचर्ड ब्रान्सन जेव्हा शाळेत शिकत होता तेव्हा त्याला शिकतांना त्रास होत होता आणी शिक्षकांकरवी तो मंदबुद्धी ठरविला गेला होता. पण रिचर्डला आपल्या मर्यादा माहित होत्या आणी त्या दिशेने तो मार्गक्रम करीत गेला. आज त्याच्या स्वतःच्या 400 कंपन्या आहे. जगातल्या 20 अब्जाधीशात त्याला स्थान आहे. गाणं म्हणण्यापासून तर हॉलीवूड चित्रपटात त्याने काम केलं आहे. काही जागतिक विक्रम आपल्या नावावर करीत गिनीज बुकातही त्याच नाव आहे. तो एवढ सर्व करू शकला कारण इतरांनी त्याच्या मर्यादा ठरविल्या त्यांनी नाही.

आपल्या सोबतही असं होत असतं. शाळेत सोबत शिकणारा एखादा सामान्य विद्यार्थी नंतर बरंच, नाव, पैसा कमवितो, विविध पद भूषवितो. मग आपण विचार करीत बसतो कि मी पण त्याच्यासारख्या अमुक- अमुक मार्गाने गेलो असतो तर तो जिथे आहे तिथे पोहोचलो असतो. पण त्याला आता काही अर्थ नसतो.

एखाद्या गोष्टीचा विचार करणे, ती गोष्ट मिळविण्याचा प्रयत्ने करणे केव्हाही चांगले असते त्या गोष्टीपेक्षा कि ज्या गोष्टीचा आपण कधीच विचारच करीत नाही आणी वेळ निघुन गेल्यावर म्हणतो कि, मी पण जर असा विचार केला असता किवा असल्या मार्गाने गेलो असतो तर आज त्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी तो/ती आहे.

म्हणून आपल्या विचारांवर, क्षमतेवर मर्यादा घालु नका. ह्या जगात केव्हा, काहीही होऊ शकते. मानसिकदृष्ट्या तयार रहाल तर संधीचा उत्तम फायदा घेता येईल. नाहीतर झाकल्या मुठेने अंतपर्यंत प्रवास तर इथे बहुतेकांचा होतो.

No comments:

Post a Comment