03 October, 2015

परतफेड (भाग- 2)

story


( भाग- 1 येथे वाचा.)

'मोरवा' हे शहरापासून 50 किमी दूर असणारं लहानसं गाव. निसर्गाने भरपूर उधळण केलेली. एका बाजूला हिरव्या वनराईने नटलेला प्रदेश तर दुसऱ्या बाजूला संथपणे वाहणारी नदी. औद्योगीकरणाचा राक्षस अजूनतरी इथे पोहोचलेला नव्हता. पण अलीकडे काही महाकाय उद्योगसमूहाची वक्रदृष्टी मोरव्यावर पडली होती. कारण एकच आणी ते म्हणजे काळ सोनं म्हणजेच कोळसा. निसर्गाने नटलेल्या हा परिसरात जमिनीखाली कोळस्याची उपलब्धतात होती आणी तेथे औष्णिक विद्युत केंद्र आणी कोळसा खाण सुरु करण्यासाठी काही मोठी उद्योग घराणी इत्छुक होती. अर्थातच गावच अर्थकारण आता बदलणार होतं. पण औष्णिक विद्युत केंद्र आणि कोळसा खाण उद्योग असा असतो कि तो तेथील गावकऱ्यांना जेवढा  देतो त्याच्या कित्येकपत त्यांच्याकडून हिसकावून घेतो. मोठ्या शहरातल्या काही लोकांना चोवीसतास वातानुकुलीत घरात अथवा कार्यालयात बसता यावं या करिता कित्येक संसार उध्वस्त आणी काही लाख लोकांची वाट ह्या औष्णिक विद्युत केंद्राने देशभरात लावली आहे. पर्यावरणाची अशीतशी करून, ओरबाडून आपण कोळसा काढतो आणी तो कोळसा उत्क्तुष्ट दर्ज्याच नसल्याने त्याचा पुरेपूर वीजनिर्मिती करिता उपयोग देखील होत नाही.

सरकारला हाताशी धरून काही मोठे उद्योगपती येथे कोळसा खाण आणी त्यालगतच औष्णिक विद्युत केंद्र सुरु करण्याच्या तयारीत आहे. शासकीय पातळीवर सर्व प्रयत्न झाले आता खरा प्रश्न आहे येथील गावकरी आणि त्यांच्या जमिनीचा. जंगले/ झाडे तोडून, शेतकर्यांच्या, गावकऱ्यांच्या जमिनी हडपुन हे सर्व सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. त्यातील काही एकर जमीन ही नवजीवन ह्या संस्थेची आहे. त्या जमिनीवर संस्थेला गावातील लोकांकरिता दवाखाना आणी येथील मुलांकरिता शाळा उघडायची आहे. परंतु आता हि जमीन उद्योगपती आपल्या घश्यात घालत आहे. शिवाय ज्या जमिनीचा मोबदला जमीन धारकांना मिळणार आहे तो देखील खूप कमी आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आणी संस्थेनी कोर्टात धाव घेतली आहे. त्याकरिता लागणारी जमिनीची कागदपत्रे मिळविण्याकरिता मागच्या वेळेस विजयराव, मिथिला आणी तिचे बाबा तलाठी कार्यालयात आले होते. परंतु तलाठ्याची येथे येणाऱ्या उद्योगिक अधिकाऱ्हांशी मिलीभगत असल्याने तो त्यांना कागदपत्रे देण्यात तसेच सहकार्य करण्यास टाळाटाळ करीत होता. ह्यावरून त्यांचात भांडण पण झाले होते. तलाठी कार्यालयात काम करणारा लिपिक धनंजय बुरले हा देखील यात सहभागी होता.

"साहेब, ह्या सर्व कामाचे मला तलाठी साहेबाकडून पैसे मिळत होते. आमचे तलाठी साहेब खाण अधिकाऱ्यांना गावातील जमिनी कमीत कमी मोबदला देऊन मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. त्याकरिता त्यांना अधिकाऱ्याकडून चांगलीच मलाई मिळत असते." धनंजय केविलवाण्या स्वरात म्हणाला.

"मग तूझ कसं काय मत परिवर्तन झालं?" विजयरावांनी विचारलं.

"साहेब, त्यासाठी खरतर एक घटना कारणीभूत आहे. तुम्ही गावात यायच्या तीन-चार दिवस अगोदर माझ्या बाळाला चांगलाच ताप आला. गावातील डॉक्टरांनी सांगितले कि ह्याला ताबडतोब शहरातील एखाद्या चांगल्या दवाखान्यात न्यावं लागेल म्हणून. रात्रीची वेळ होती. बाळ तापान फणफणत होतं. शहराकडं जाणारी शेवटची बस सुद्धा निघून गेली होती. पाटलाची गाडी बाहेरगावी गेली होती. मग तलाठी साहेबांकडे मदत मागायला गेलो. तलाठी साहेबांची गाडी घरी असूनही त्यांनी नकार दिला. गयावया करूनही त्यांना माझ्या तान्ह्याची जराही दया आली नाही. आम्ही हतबल झालो. समोर अंधार दिसू लागला. मदतीकरिता चौकात आलो. समोर तुमची गाडी दिसली. लाज वाटत होती ज्यांच्याशी भांडलो त्यांनाच मदत मागायला. परंतु प्रश्न पोराच्या जीवाचा होता. त्यासाठी भिक मागायलाही मागे-पुढे पहिले नसते. तुम्हाला मदत मागितली आणी तुम्ही ती केली देखील. डॉक्टरांनी सांगितले कि तास- दोनतास उशीर झाला असता तर पोरगा वाचला नसता म्हणून."

धनंजयच्या डोळ्यात पाणी दाटलं होत. त्याचा आवाज भरून आला होता. सुमी म्हणजेच धनंजयची बायलो चहा घेऊन आली. धनंजयचा घसा कोरडा पडला होता. त्याने दोन घुट पाणी पिले आणी पुढे बोलू लागला,

"मी नंतर माहिती काढली तुमच्या बद्दल तर कळलं कि तुम्ही ज्या संस्थेच्या जमिनीच्या कागदपत्राकरिता आले होता तीने शहरात खूप चांगले सामाजिक कार्य केले आहे आणी आपल्या गावातपण काहीतरी चांगलं सुरु करण्याचा उद्देश आहे म्हणून. मग ठरवलं कि ज्यांच्यामुले माझ्या मुलाचा जीव वाचला त्यांची जेवढी होईल तेवढी मदत करून त्यांच्या उपकाराची परतफेड करायची."

"अरे धनंजय उपकार कसले? ही तर लहानशी मदत होती. एवढी मदत तर प्रत्येकानेच करायला पाहिजे." चहाचा घुट घेत विजयराव म्हणाले.

"पण माझ्यासाठी ते उपकारच होते साहेब. तुम्ही त्यादिवशी लिफ्ट नसती दिली तर आज माझा मुलगा जिवंत नसता. खरतर हि मदत तलाठी साहेबांनी करायला पाहिजे होती पण त्यांनी वेळेवर हाथ वर केले. त्यांच्या नकळत मी हि सगळी कागदपत्रे काही महिन्यापासून जमवत होतो. आणी शक्य होईल तेवढी कागदपत्रे जमवून आपल्याला पाठवून दिली."

"फार त्रास झाला असेल ना तुम्हाला हे सगळं जमवितांना?" मिथिलाने विचारले.

"ताई, तुम्ही केलेली मदत आणी तुमच्या संस्थेचा चांगला उद्देश त्यापुढे हा त्रास काहीच नाही आहे. शिवाय आपण गावात दवाखाना आणी शाळा उघडण्याचे पवित्र कार्य हाती घेतले आहे असं कळल तेव्हा ह्या खाणी आणी वीजनिर्मिती केंद्रपेक्षा शाळा आणि दवाखान्याची आम्हाला जास्त गरज आहे. त्यामुळे आपले काम सत्कारणी लागेपर्यंत मी आपल्याला होईल तशी मदत करीत राहील."

"धन्यवाद धनंजय, अतिशय योग्यवेळी तुनी आम्हला ही कागदपत्रे पाठविली त्याबद्दल. कोर्टात याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल." बाबा म्हणाले.

"साहेब आभार तर मी आपले मानायला पाहिजे. आपल्या मदतीची परतफेड ह्या जम्नी तरी शक्य नाही तरी होईल तशी मी आपल्याला मदत करीत राहील."

वापस जातांना मिथिलाच्या मनात समाधानाची भावना होती. त्या दिवशी जेव्हा धनंजयने मदत मागितली तेव्हा प्रथम बाबांनी आणी विजयरावांनीसुधा नकारच दिला होता कारण काहीवेळापूर्वी तलाठी आणी धनंजयशी झालेले भांडण. पण पूर्वग्रह बाजूला ठेवून एक माणूस म्हणून जेव्हा तिने विचार केला तेव्हा त्या तान्ह्या बाळाला बघुन एका स्त्रीचे हृदय द्रवले नसतेतर नवलंच. तिनेच बाबांना आणी विजयरावांना राजी करून धनंजय, सुमी आणी त्याच्या आजारी मुलाला गाडीत जागा दिली होती. याचं तिला नक्कीच समाधान होतं. (समाप्त.)