27 March, 2015

कुठे हरविली ती फायटिंग स्पिरीट...?

Where is Fighting spirit of Men in Blue.?

काल क्रिकेट विश्व चषकातील उपात्यफेरीतला ऑस्ट्रेलियासोबत असणारा सामना भारत हरला. खेळ म्हटलं तर हार- जीत आलीच. काल भारत हरला या पेक्षा जास्त दुखः तो फाईट ब्याक न करताच म्हणजेच काट्याची टक्कर न देताच हरला याचं झालं. म्हणतात ना कि एखादा युद्धविर किवा खेळाडू रणभूमीवर अथवा मैदानावर प्रत्येक्ष हरण्याआधी जर तो मनातून हरला तर मग कुठलीही टाकत त्याला जिंकवू शकत नाही. भारताच काल तसच झालं. ती जिद्द, तो जस्बा, ती फायटिंग स्पिरीट काल भारतीय टीम मध्ये कुठेच दिसली नाही. मान्य 328 रणाचे लक्ष्य फार मोठे होते पण जिद्दीने मी ते पूर्ण करणारच किवा काही झालं तरी ह्या साल्या ऑसी लोकांना ठोकूनच हरायचं हा जो एटीट्युड असतो ना हा काल कुठेच पहायला मिळाला नाही. उलट मोहित शर्मा सारखा बॉलर 100- 110 प्रती तास इतक्या वेगाने बॉल टाकत होता. त्याला पाहून असं वाटत होत  कि तो ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग स्पिचवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा विश्वचषकाचा सामना खेळत नसुन महाराष्टाच्या एखाद्या इंटर युनिवार्सितीचा सामना खेळत आहे. रणजी खेळणारे युवा बॉलरतरी त्याचापेक्षा वेगवान बॉलिंग करण्याची धमक ठेवतात. बर बॉल स्विंग करायचं म्हटलं तर ते पण नव्हत होत या पाठ्याच्याने. त्याच्याच एवढ्या वा थोडा अधिक वेग असणाऱ्या फौकनरची बॉलिंग बघा. पुन्हा एक आपल्या टीमचे आदरणीय सदस्य 'सर (?) रवींद्र जडेजा' बघा. यांचे तर बॉल स्पिन होतंच नव्हते. त्याहीपेक्षा हे महाशय अधिकचा प्रयत्न करून विकेट्स काढताना पण आढळले नाही. 'फुकटाला महाग' अश्या म्हणीप्रमाणे स्थिती होती त्यांची. त्याच तुलनेत त्यांच्या नवख्या म्याक्सवेलची स्पिन बॉलिंग बघा. सगळेजण कोहलीला (सोबतच अनुष्काला पण) दोष देत होते. त्याला एकट्याला दोष देऊन काय अर्थ? हा सांघिक खेळ आहे. मग बाकीच्यांची काही जबाबदारी नव्हती? बाकीचे 10 जण काय मुजरा करायला होते तेथे?

खरतर भारतीय लोक क्रिकेटकडे पूर्वीपासूनच One Man Talent खेळ म्हणूनच बघत आले आहे. विजयाचा  शिल्पकार एकच असतो पण त्याच्यामागे पूर्ण संघाचं टीमवर्क असत. पण आपण फार पूर्वीपासून गावस्कर, कपिल देव, तेंडुलकर आणी आता विराट कोहली अश्या एक- एक व्यक्तीवर अवलंबून राहत आलो आहे.  म्हणजे महत्वाच्या सामन्यात तो व्यक्ती चांगलाच खेळला पाहिजे. पण एखाद्या खेळाडूने खूप चांगले खेळण्यापेक्षा 2- 3 खेळाडूने आपली जबाबदारी समर्थपणे पर पाडणे जास्त फायद्याचे असू शकते. म्हणजे काल्यच्या सामन्यात कोहलीने किवा रोहितने शतक मारण्यापेक्षा जर बोलर्सनी थोडी चांगली बॉलिंग आणी क्षेत्ररक्षकांनी कसलेले क्षेत्ररक्षण केले असते तर भारत ऑसीला 280  पेक्षा कमी धावत रोखू शकला असता. आणी मग आपल्यावर लक्ष्य गाठायला एवढे मानसिक दडपण आले नसते. असो. जर- तरच्या गोष्टीला काही अर्थ नसतो. पण मला भारतीय टीमची एक गोष्ट अजुन कळली नाही, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जेथे खेळपट्या उसळी घेणाऱ्या आणी वेगवान बोलर्सला मदत करणाऱ्या असतात आणी जेथे ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका सारखे देश 4- 4 वेगवान बोलर्स खेळवतात तेथे आपण यादव आणी शमी सारखे दोनच फास्टर खेळवतो. काय भारतासारख्या एवढ्या अजस्त्र आणी क्रिकेटवेड्या देशात 4 चांगले 140 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकणारे बोलर्स मिळू नये? केवढे हे दुर्दैव? आपण आजही ह्याच मानसिकतेत वावरतो कि फलंदाजच सामना जिंकून देतात. भारतीय टीममध्ये नेहमी फलंदाजच हिरो बनतात. कपिल देव सोडले तर एकही आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव आणी दबदबा तयार करू शकणारा बॉलर भारतात जन्माला आला नाही.

टीम वर्क हि सामन्यात खूप महत्वाची असते. त्यामुळेच खेळाडूत फायटिंग स्पिरीट येते. काल तोही अभाव होता. यादवने बाऊड्री जवळचे 2 सहज अडवता येणारे बॉल सोडले. आपण ऑसीच्या एकही खेळाडूला डायरेक्ट थ्रो मारून रणआउट करू शकलो नाही. त्यांनी 2 आउट केले. अश्या वेळेस आपले थ्रो कधीच लागत नाही. खरतर येथे ऑसी आणी भारतीय टीमची तुलना करायची नाही आहे. पण त्यांच्या सांघिक खेळात किती एकसूत्रता होती हे सांगायचे आहे. आणी खरच याचे सारे श्रेय कप्तान मायकल क्लार्कला जाते. त्याने काल  कप्तानशिपमध्ये नक्कीच धोनीवर मात केली. खरतर कालच्या सामन्यात ते डिझर्व करत होते जिंकणे, आणी ते जिंकले. त्यांची फायटिंग स्पिरीट आपल्यापेक्षा प्रचंड जाणवत होती.

-=-=-=- इतर लेख वाचा.                                       कविता वाचा.-=-=-=-

No comments:

Post a Comment