22 October, 2014

लोकसभेतील 10 सुंदर स्त्री खासदार

महिला म्हटल्या कि सुंदरता, त्याचं देखणं रूप आलंच. मग त्या महिला चित्रपटश्रुष्टीतल्या असो, खेळातल्या असो नाहीतर राजकारणातील असो. त्यांच्या सौंदर्याची तारीफ आणी चर्चा होतच असते. आणी याला आपल्या राजकारणातील महिला देखील अपवाद नाही. आज आपण इथे पाहणार आहो 16 व्या म्हणजेच सध्याच्या लोकसभेतील महिला खासदार आणी त्यांचा सौंदर्यानुसार लागणारा क्रमांक. आपण आघाडीच्या 10 महिला येथे विचारात घेणार आहो.


(सूचना- येथे केवळ '16 व्या लोकसभे'च्याच महिला खासदारांचा विचार करण्यात आला आहे.)

10- सुप्रिया सुळे 

महारष्ट्रातील मातब्बर नेते आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या 2009 मध्ये सुधा येथूनच लोकसभेवर गेल्या होत्या. त्याआधी त्या राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांचा या यादीत 10 वा क्रमांक लागतो.

9- पुनम महाजन 

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पूनम ह्या कन्या आहे. त्या उत्तर मध्य मुंबईचे प्रतिनिधित्व करतात. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांची हि पहिलीच लोकसभा वारी (टर्म ) असून 2014 च्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा त्यांनी 1.86 लाख मतांनी पराभव केला होता.
8- हरसिम्रत  कौर बादल

हरसिम्रात कौर बादल या शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवार असून त्या पंजाब मधील भटिंडा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या त्या केंद्रात अन्न प्रक्रिया उद्योग विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचा या यादीत आठवा क्रमांक लागतो.7- सुषमा देव 

कॉंग्रेसच्या उमेदवार सुषमा देव या आसामातील सिलचर या भागाचे प्रतिनिधित्व करतात. त्या पूर्वीचे खासदार संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. त्यांचा या यादीत 7 वा क्रमांक लागतो.


6- प्रीतम मुंडे 

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रीतम मुंडे ह्या कन्या आहे. वडिलांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर त्यांना उमेदवार देण्यात आली होती आणी तेथून त्या 6,92,245 एवढ्या मताच्या फरकाने निवडून येत भारतात सर्वात जास्त फरकाने निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांचा या यादीत 6 वा क्रमांक लागतो.5- रिती पाठक 

रिती पाठक या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असून त्या मध्य प्रदेशातील सिधी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.


4- भावना गवळी 

शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या भावना गवळी या यवतमाळ- वाशीम या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची हि तिसरी लोकसभा वारी आहे.
3- अनुप्रिया पटेल 

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून निवडून आलेल्या 'अपना दल' पार्टीच्या अनुप्रिया पटेल यांचा या यादीत 3 रा क्रमांक लागतो. खासदार होण्यापूर्वी त्या उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होत्या. अपना दलचे संस्थापक सोनलाल पटेल यांच्या त्या कन्या आहेत.2- हेमा मालिनी 

भारताची 'ड्रीमगल' आणी बॉलीवूड स्टार हेमा मालिनी यांच्या सौंदर्याची प्रचीती साऱ्या देशाला आली आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असून उत्तरप्रदेशातील मथुरा या भागाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो.  1- डिंपल यादव 

समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या डिंपल या स्नुषा तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या त्या पत्नी आहेत. त्या कानुज या उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून निवडून आल्या आहे. त्यांचा जन्म रि. आर्मी कर्नल एस. सी. रावत यांच्या पोटी पुणे येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळ उत्तराखंडचे आहे.
त्यांना लाभलेल्या अप्रतिम सौंदर्यामुळे आणी त्यांच्या गोर्जीयस लूक मुळे त्यांना या यादीत प्रथम स्थान देण्यात आले आहे.(सूचना:- हि क्रमवारी मी व माझ्या सहवासात असणाऱ्या काही लोकांच्या मतावरून बनविली आहे त्यामुळे आपण ह्या क्रमवारीशी सहमत असलाच पाहिजे असं काही जरुरी नाही.)

No comments:

Post a Comment