16 April, 2014

निवडणूक

आली निवडणूक 
वाजला दिंडोरा,
गल्ली-बोळ्यात  
नेत्यांचा हिंडोरा.

कुणाला जयभीम 
कुणाला राम-राम, 
उन्हात फिरून नेत्यांचा 
निघतोय घामच-घाम.

जमविली पोर 
आणल्या गाड्या,
प्रचारासाठी आता 
राल्याच-राल्या.

कुणाला मोबाईल
कुणाला देशी,
निवडणुकीच्या दिवसात 
नाहीच राहत कुणी उपाशी.

पिंजून होतोय वार्ड 
गल्यापण सुटत नाही,
निवडणूक झाल्यावर नेता 
कुणालाच दिसत नाही.

कधी वाटतोय नोटा 
कधी वाटतोय साडी,
नेता आपल्या जनतेची
अचूक पकडतो नाडी.

मोठे- मोठे दावे 
अन आश्वासनांची खैरात,
विजयी झाल्यावर मग 
संपूर्ण गावभर वरात.

जाती-धर्माचे दाखले 
देऊन ठेवतो अचूक बोट,
धर्मनिरपेक्ष आम्ही मग 
देतो जातीवर वोट.

निवडून आल्यावर मग
वाढतो यांचा भाव,
मग हा आमच्या बापाला 
पण विचारात नाही राव.

कसली आली जनता 
अन कसली आली सेवा,
5 वर्षात हा 
खातो मेवाच- मेवा.

आम्ही विकतो मुटभर 
पैश्यासाठी आपले इमान,
मग हाच नेता आमच्या मानगुटीवर 
बसून उडवितो आपले विमान.

5 वर्षात सारा गावच काय 
देशाला पण लुटून होतो मोकळा,
पुन्हा पुढच्या निवडणुकीत पैसे देऊन 
वोट मागायला मोकळा.

- अनिकेत भांदककर.

2 comments: