04 January, 2016

चारोळी- 33,34,35 आणी 36



चारोळी- 33

चुक माझी हि होती 
कि मी चुक कबुल केली.
खोटारड्या या जगात
मोठी चुक केली.


चारोळी- 34

साथ तुझी असताना भासे 
जग कवेत असल्यासारखे 
जणु नजर क्षितिजापल्याड 
आणी मन हवेत असल्यासारखे.


चारोळी- 35

आठवणीच्या विश्वात 
तुझीच गर्दी 
तुच नाही तर
साऱ्याच दर्दी.


चारोळी- 36

तुझ्याशिवाय मला
कोण म्हणेल आपलं.?
तु पण नाही म्हटलं तेव्हा
डोळ्यामधे पाणी दाटलं.

- Aniket Bhandakkar