29 September, 2014

चेतन भगत- हाफ गर्लफ्रेंडच्या निमित्याने

हाफ गर्लफ्रेंड' हे चेतन भगतच सातवं बुक आणी सहावं नॉवेल. आधीची पाचही नॉवेल चांगलीच गाजली. इतकी कि त्यातल्या पहिल्या चार नॉवेलवर चित्रपट बनले आहे आणी उर्वरित एका  नॉवेलचे चित्रपटासाठी कॉपीराईट्स विकल्या गेले आहे. चेतन भगत हे एक लेखक म्हणून युवकात चांगलेच लोकप्रिय झाले आहे. इतके कि काही दिवसापूर्वी चेतनने आपले नवीन नॉवेल 'हाफ गर्लफ्रेंड' लवकरच पब्लिश होत आहे असे जाहीर केले आणी त्याच्या चाहत्यांनी त्याच्या वेबसाईटवर इतकी गर्दी केली कि त्याची वेबसाईटच क्राश झाली.

सद्या युवकांमध्ये नॉवेल वाचनाची भयंकर क्रेझ आहे. त्यातल्यात्यात फिक्शन तर सर्वात आघाडीवर. कितीही फेसबुक, व्हाट्सअप किवा स्मार्टफोन येउदे परंतु पुस्तक (Hard Copy) वाचण्याची क्रेझ काही कमी होणार नाही. एकीकडे भारतीय तरुण वाचन संस्कृती विसरत चालले आहे असे म्हणताना दुसरीकडे हेच तरुण चेतन भगत, रविंदर सिंग, अमिष त्रिपाठी, दुर्जोय दत्त ई. तरुण लेखकांच्या कादंबऱ्या डोक्यावर घेतांना दिसतात. दिवसरात्र वाचून त्याचा फडश्या पाडतात. त्यासंबंधी आपल्या ब्लॉगवर किवा सोशल नेटवर्किंग साईटवर रिव्हिव लिहितात. दुर्दैवाने यात मराठी लेखक कुठेच दिसत नाही. मराठी तरुण लेखकांनीसुधा आता इंग्रजीत कादंबरी लिहायची गरज आहे. सुदीप नगरकर या मराठी तरुण लेखकाचं 'फिव थिंग्स लेफ्ट अन्सेड' (Few Things Left Unsaid) हे  इंग्रजी नॉवेल गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी गाजलं.

मराठी तरुण लेखकांनी चेतन भगत कडून नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. एक IIT मधून इंजीनियरिंग केलेला तरुण पुढे IIM अहमदाबाद सारख्या अव्वल व्यवस्थापन संस्थेतून व्यवस्थापनाची पद्युत्तर पदवी घेतो. पुढे HSBC या आंतरराष्ट्रीय  बँकेत इन्व्हेस्टर बँकर म्हणून काम करतो. उच्च पगाराची नौकरी, पॉश कॉर्पोरेट लाईफ स्टाईल आणी सोबतच नॉवेल लिहिण्याचे काम सुरु असते. तो एका मागून एक नॉवेल लिहित जातो, ते प्रचंड लोकप्रिय होत जातात आणी शेवटी आपली बँकेतली उच्चपदावरची नौकरी सोडून तो पूर्णवेळ लेखन करण्याचा निर्णय घेतो. व आज त्यांना आपण बेस्टसेलर लेखक म्हणून ओळखतो. त्याचप्रमाणे तो काही आघाडीच्या वृत्तपत्रात स्तंभलेखन, चित्रपट- सिरीयलसाठी स्क्रीनप्ले ई. सुधा लेखन करतो. त्यांनी ना M.A इंग्लिश केलं आहे ना साहित्यातली कोणती पदवी घेतली आहे तरी ते इतकं चांगलं लेखन करू शकतात. म्हणजेच चांगला लेखक होण्यासठी कोणत्या कागदी तुकड्याची नाहीतर क्रिएटीव्हीटीची आणी सामाजिक भान असण्याची गरज असते.

'हाफ गर्लफ्रेंड' हि एक प्रेमकथा आहे. माधव नावाचा एक इंग्लिश बरोबर न बोलता येत असलेला तरुण बिहार मधून दिल्लीला सेंट स्टीफन्समध्ये शिकायला येतो. तेथे रिया नावाच्या इंग्लिश चांगलं बोलता येत असलेल्या श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो. आपल्यात आणी रियात मैत्रीच्या पलीकडेही काही नात आहे असं माधवला वाटत परुंतु ती त्याची गर्लफ्रेंड नसते. म्हणून ह्या नॉवेलला 'हाफ गर्लफ्रेंड' हे शीर्षक दिल्या गेलं आहे. अर्थात त्यात अजुन बरेचश्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला हे नॉवेलच वाचावं लागेल. आतापर्यंत चांगली दर्जेदार नॉवेल्स वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या लेखकाकडून या नॉवेलसंबंधी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.

2 comments:

  1. "मराठी तरुण लेखकांनीसुधा आता इंग्रजीत कादंबरी लिहायची गरज आहे." मग मराठी वाचकांचं काय होईल? हाच प्रश्न माझ्या समोर आहे.

    ReplyDelete
  2. सर, आजच्या तरुण पिढीचा मराठी पेक्षा जास्त इंग्रजी कादंबरी वाचनावर भर दिसतो, आणी इंग्रजीमुळे कादंबरी राष्ट्रीयच नाही तर जागतिक स्तरावरील वाचकांपर्यंत पोहचू शकेल.
    राहिला प्रश्न मराठी वाचकांचा तर मराठी लेखन करणारे पुष्कळ साहित्यिक आहे शिवाय इंग्रजी कादंबरीचे भाषांतरही करता येईल.

    ReplyDelete