04 July, 2014

फुटबॉलचा ज्वर

जसजशे फुटबॉल चे सामने पार पडत आहे तसतसा फुटबॉलचा ज्वर वाढत चालला आहे. नुकतीच दुसरी फेरी पार पडली. पहिल्या फेरीतील 32 पैकी फक्त 16 च संघ या दुसऱ्या फेरीत पोहोचतात. व आता 16 पैकी फक्त 8 च संघ उपात्यापुर्व फेरीसाठी पात्र ठरले आहे. आता त्यांच्यातील पुढील घमासान 4 जुलै ते 14 जुलै च्या पहाटे पर्यंत (भारतीय वेळेनुसार) चालणार आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय खेळ अशी बुरुदावली मिळविनारा फुटबॉल हा खेळ जगातील 190 पेक्षा जास्त देशात (काही देशात कमी प्रमाणात का असेना )खेळला जातो. FIFA या फुटबॉल च्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे तर तब्बल 209 संघ प्रतिनिधी आहे. यावरून फुटबॉल खेळणार्यांचा अंदाज येईल. आणी त्यातल्या त्यात या वेळेचा विश्वचषक होतोय ब्राझील या फुटबॉल वेड्या देशात. जसे भारतात क्रिकेट तसेच ब्राझीलमध्ये फुटबॉल हा धर्म आहे. आणी जसा क्रिकेटमधील देव म्हणजे सचिन तसच फुटबॉल मधील देव म्हणजे 'पेले' हा देखील ब्राझीलचाच. 

तब्बल 5 वेळा फुटबॉल चा विश्वचषक पटकाविणाऱ्या ब्राझीलला 6 विश्वचषकाचे वेध लागले आहे. मायभूमीतील ही सुवर्णसंधी हातची जाऊद्यायची नाही या निश्चयाने ब्राझीलचा संघ मैदानात उतरला आहे. त्या संघाची संपूर्ण मदार त्यांचा स्टार खेळाडू 'नेयमार' वर टिकून आहे. त्याच प्रमाणे इतरही देशातले स्टार खेळाडू आपल्या गोलने मैदान गाजवत आहे. आर्जेन्टीनाचा 'मेस्सी', नेदरलंडचा 'व्यान पर्सी व रॉबेन' जर्मनीचा 'म्युलर' ई. खेळाडू त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करीत आहे. यास सर्वात मोठा अपवाद ठरला तो पोर्तुगालचा 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'. प्रचंड लोकप्रियता, अंगी असलेले कौशल्य, चेंडूवर असणारा ताबा, इंग्लिश आणी युरोपियन फुटबॉल लीग मधून मिळणारा अमाप पैसा यामुळे नेहमी चर्चेत राहणारा आणी गत वर्षीचा फिफाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकाविणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणी त्याचा संघ, दोघेही पहिल्या फेरीतच बाहेर पडले. 

गत विजेत्या स्पेनचे आव्हान देखील पहिल्या फेरीतच संपुष्ठात आले. त्याच प्रमाणे इंग्लंड सारखा तगडा संघ देखील पहिल्याच फेरीत घरी गेला. काही नवख्या आणी कच्या संघाने यंदा दमदार कामगिरी केली. त्यांनी तगड्या संघाला चांगलाच घाम गळायला लावला.

विश्वचषकात सध्या गाजतोय उरुग्वेच्या स्टार खेळाडू 'सुवारेझ' याने त्याच्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूचा सामना सुरु असताना मैदानावर घेतलेला चावा. यामुळे फिफाने त्याच्यावर 4 महिन्याची बंदी घातली आहे. सुवारेझ च्या अभावी उरुग्वेला बाद फेरीत सामना खेळायला जड गेले व त्यांचे आव्हान बाद फेरीत संपुष्टात आले.

आतापर्यंतच्या खेळात सरप्राईज प्याकेझ ठरला तो कोलंबियाचा संघ. फारशा कुणाच्या ध्यानीमनी नसणारा ह्या संघाने  पहिल्या आणी बाद अश्या दोन्ही फेरीत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या  २२ वर्षीय युवा खेळाडू 'रोद्रिगेझ' ने तर धमाल उडवून दिली आहे. आता पर्यंत 5 गोल ठोकून हा युवा खेळाडू मेस्सी, व्यान पर्सी, नेयमार, म्युलर, क्लोस ई. स्टार खेळाडूंना पिछाडीवर सोडून आपले अव्वल स्थान एटीत मिरवत आहे. 

विश्वचषक कोण जिंकेल हे आताच सांगणे अवघड आहे. नेदरलंडला आपला गतवर्षी झालेला अंतिम फेरीतल पराभवाचा वचपा काढायचा आहे तर काही झाले तरी घरच्या मैदानावर बाजी मारायची असा ब्राझील चा होरा आहे. उत्पांत्यपूर्व फेरीतील 8 ही संघाची आता झोप उडाली आहे. त्यांना प्रतीक्षा आहे ती 13 जुलैला (भारतात 14 जुलैला ) होणाऱ्या अंतिम सामन्याची.

No comments:

Post a Comment