31 May, 2014

मोदी शतक ठोकतील का हेच आता पहायचे आहे

बुरसटलेल्या आणी उदासवाण्या विचाराने जेव्हा एखादी खेळी सुरु होते आणी वेळामागून वेळ निघून जाते तरीसुद्धा उत्साहाचा वा उत्कर्षाचा लवलेशही जिथे दिसत नाही तिथे प्रवाहाच्या बाजूला होऊन थोड वेगळं करू पाहणाऱ्याचं कौतुक होत असत. आणी जर का त्यात त्याला यश आलंच तर मग जनता त्याला समाजाचा उधराकर्ता म्हणून मिरवायलाही मागे-पुढे पाहत नसते.

समाजाचा उधार करायचाय म्हणून धोरणं आखायची, त्याला आपल्याच कुटुंबातील लोकांची नावे द्यायची, ती धोरणं राबवण्यासाठी सामान्य जनतेच्या करापोटी आलेल्या पैश्याची तरतूद करायची आणी गरिबांची सहानुभूती पदरात पाडुन गरिबांचे आणी दुर्लक्षितांचे कसे आपणच कैवारी आहो या थाटात मिरवायचे. एकदा का योजना लागू झाली कि मग तिच्याकडे ढुंकूनही पहायचे नाही. (प्रचंड खर्च करून राबविण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा योजनेचे आताच 12 वाजल्याचे ठोके ऐकू येऊ लागले आहे) आपल्याच पक्षातील नेते, लोक आणी तथाकथित सरकारी अधिकारी/ कर्मचारी त्या योजनेचा बट्याबोळ करतील तरी मग त्यात नाक खुपसायचे नाही आणी मग नंतर कधीतरी भाषणात आवर्जून सांगायचे कि गरिबांवर खर्च होणाऱ्या 100/- रुपयातील फक्त 2/- रुपये  त्यांच्यापर्यंत पोहोचतात म्हणून. याला काय म्हणायचे? भ्रष्टाचाराला समर्थन कि सरकारचा (आता भूतपूर्व) नाकर्तेपणा?

हाच नाकर्तेपणा भोवला, भारतीय जनतेला गृहीत धरणार्यांना जनतेनी क्लीन स्वीप दिली. त्यांनी 'डंके कि चोट पर' छाती ठोकून सांगितलं कि तुम्ही आम्हाला अडाणी समजत असाल आणी सहानभूती द्वारे आमचे वोट मिळवत असाल तर याद राखा! विरोधी बाकावर बसण्याची पण लायकी ठेवणार नाही आम्ही तुमची.

खर तर हे फार पूर्वीच घडायला पाहिजे होत पण तेव्हा जनतेला तडजोड करण्यावाचून काही पर्याय नव्हता. पण आता लोकांना मोदीच्या रूपाने सक्षम पर्याय मिळाला आहे. मोदी च्या भाजपाला एकहाती सत्ता देऊन, यापुढे पिचलेल्यांना सत्ता मिळणार नाही असा संदेश जनतेने दिला आहे. पण मोदींना एकहाती सत्ता दिली म्हणजे असं नाही कि त्यांनी काहीही केलं अथवा काहीच नाही केलं तरी चालेल. फक्त जनतेने चाबूक दुसऱ्याच्या हातात दिला आहे ह्या देशाचा गाडा हाकणासाठी. जनतेने एक विश्वास दाखवला आहे मोदींवर आणी त्या विश्वासावर खर उतरण्याची आता जबाबदारी मोदी आणी टीमची आहे.

याचीच प्रचीती देत मोदींनी आपला दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. दर चार महिन्यात सुरु होणाऱ्या एका नवीन योजनेला आणी तिच्या नावाला कांटाळलेल्या लोकांनी मोदींच्या या 10 कलमी कार्यक्रमाकडे जातीने लक्ष नाही ठेवले तर नवलंच. कारण एखाद्या घोषणेच्या अंबलबजावणीपासून तर तिची पुर्ती वाट लागतपर्यंतचा प्रवास जनतेला नवीन राहिलेला नाही. त्यामुळे या 10 कलमी कार्यक्रमाची आणी भविष्यात घेतलेल्या निर्णय/ योजनेची यशस्वीरीत्या जर अंबलबजावणी झाली नाही तर जनता पुढच्या निवडणुकीत सध्याच्या सरकारचेसुधा पानिपत करेल यात शंका नाही. त्यामुळे मोदींनी सुरु केलेली ही नवीन राजकीय खेळी जनतेचा कौल आणी त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता शतक ठोकेल का हेच आता जनतेला बघायचे आहे.

2 comments:

  1. तेव्हा कशाला आताच्या महाराष्ट्राच्या आणि विधानसभा निवडणुकीतच सारे स्पष्ट होईल. भाजपा बहुमतानं सत्तेवर इएइल असा माझा अंदाज आहे.

    Indian Politics : पंडित नेहरू ते आदित्य ठाकरे

    हा लेख पुर्ण वाचा.

    http://maymrathi.blogspot.in/2014/09/indian-politics_26.html

    ReplyDelete
  2. सर, जर बहुमताची सत्ता आली तर 5 वर्ष चिंता नसणार परंतु विकासाची कामे आणी आश्वासनं पूर्ण झाली तरच अर्थ आहे नाहीतर कॉंग्रेस काय नी भाजपा काय, सगळे एकाच माळेचे मनी ठरतील.

    ReplyDelete